‘रुळानुबंध’ : म्हटलं तर हे एका ‘लोकोपायलट’चं आत्मकथन आहे, पण त्याच वेळी आठवणींच्या प्रदेशात केलेली स्वैर मुशाफिरीदेखील आहे!
लोकोपायलटचं हे जगणं विलक्षण आणि खूपच वेगळं आहे. सलग आठ-दहा तास ड्युटी करणाऱ्या ड्रायव्हरसाठी इंजिनमध्ये या मूलभूत सुविधादेखील नसतात. अनेकदा डबासुद्धा कसाबसा खावा लागतो. इंजिनाला मागे जोडलेल्या २०-२२ डब्यांत बसलेल्या माणसांचं जीवन सुरक्षित राहावं, ही जबाबदारी असते, पण त्यासाठी समोर आलेल्या जीवाला मात्र तो वाचवू शकत नाही! हे सगळं ‘रुळानुबंध’मध्ये वाचताना, मनाच्या तळाशी एक अपराध-भावना दाटून येते.......